“आंधळी” हे गाव पुरातन काळात वसलेले गांव आहे. पलुस तालुक्याच्या उत्तरबाजूस 6 कि.मी.अंतरावरती वसलेले गांव आहे. पुरातन काळात गावामध्ये माळभागावरती फकीराची वस्ती होती व गावामध्ये गोसाव्यांची वस्ती होती गोसाव्यांची वस्ती ग्रामदैवत सिध्दनाथ देवालयासमोर होती त्यामुळे अद्याप गोवाव्यांची पांढर म्हणून प्रसिध्द आहे. इ.स. सन मध्ये विजापूरच्या बादशहाच्या दरबारी माने लोकांना मान होता,

आंधळी

आंधळी,
ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना–

“आंधळी” हे गाव पुरातन काळात वसलेले गांव आहे.  पलुस तालुक्याच्या उत्तरबाजूस 6 कि.मी.अंतरावरती वसलेले गांव आहे.  पुरातन काळात गावामध्ये माळभागावरती फकीराची वस्ती होती व गावामध्ये गोसाव्यांची वस्ती होती गोसाव्यांची वस्ती ग्रामदैवत सिध्दनाथ देवालयासमोर होती त्यामुळे अद्याप गोवाव्यांची पांढर म्हणून प्रसिध्द आहे.  इ.स. सन मध्ये विजापूरच्या बादशहाच्या दरबारी माने लोकांना मान होता, विजापूरच्या बादशहाने चारी बाजूने तटबंदी केली व गावाच्या पुर्व व पश्चिमेस दोन दरवाजे तयार केले पश्चिमेस दरवाजेच्या  बाहेर धर्मशाळा होती.  सन 1956 मध्ये आंधळी ग्रामपंचायतीची स्थापना झाली. सन 2001 च्या जनगणेनुसार आंधळी गावची लोकसंख्या 3200 इतकी आहे.  वेरळा नदीकाठावरती वसलेले गांव आहे व नदीकाठावरती महादेव मंदिराची स्थापना केलेली आहे.